आमदार मंगेश चव्हाण व भाजपा पदाधिकारी यांनी केले अभिवादन
चाळीसगाव – उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे मंदिर उभारणी होत असून आज दि.९ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या मिरवणुकीत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांनी सहभागी होत तुकोबांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.
टाळ मृदंग, ढोल – लेझीम पथक – हरिनामाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत वारकरी महिलांसह आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी तुकोबांच्या व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, विवेक चौधरी, बंडू पगार, अरुण पाटील, रमेश सोनवणे, भैय्यासाहेब पाटील, पप्पू राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील भक्ती गीतांवर ठेका धरत भाविकांचा उत्साह वाढविला.