जळगाव – जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविदयालयाच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभाग उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन मुलांना रोजगारक्षम बनविण्यात महत्वाची भुमिका बजावत आहे. मागील काळात विविध क्षेत्रात लागणाऱ्या विशेष कौशल्याची नोंद घेत महाविदयालयातील तसेच उदयोग क्षेत्रातील तज्ञांचे प्रशिक्षण घेण्यात आले़.
याचाच परिणाम म्हणुन नुकत्याच झालेल्या बालाजी ऑटो लिमिटेडच्या खुल्या परिसर मुलाखतीत रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयातील मॅकनिकल विभागाच्या तृतीय वर्षाच्या मानव विक्की पारवानी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू व रायसोनी पाॅलीटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य तुषार पाटील यांनी मानव पारवानी याचे अभिनंदन केले असून ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा़ पंकज पाटील व प्रा. हर्षद पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे.