- जिल्ह्यातील 2 लाख 97 हजार लाभार्थ्यांना
- 1 हजार 229 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर
- जिल्ह्यातील 2 लाख 97 हजार 49 लाभार्थ्यांना 1 हजार 229 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर
- शिशु गटात 2 लाख 64 हजार 5 लाभार्थ्यांना 749 कोटी 53 लाख रुपयांचे कर्ज वाटप
- किशोर गटात 23 हजार 584 लाभार्थ्यांना 285 कोटी 16 लाख रुपये कर्ज वाटप
- तरुण गटात 9 हजार 460 लाभार्थ्यांना 195 कोटी 18 लाख रुपयांचे कर्ज वाटप
- 1 लाख 29 हजार 144 लाभार्थ्यांना 349 कोटी 41 लाख रुपयांचे कर्ज वाटप करुन मायक्रो फायनान्स कंपन्यांची आघाडी
जळगाव, दि. 4 – सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी तसेच छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत विविध गटातंर्गत बॅकांमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेतंर्गत 31 मार्च, 2019 अखेरपर्यंत विविध बँकांनी जिल्ह्यातील 2 लाख 97 हजार 49 लाभार्थ्यांना 1 हजार 229 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत शिशु गटासाठी 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात या गटात 2 लाख 64 हजार 5 लाभार्थ्यांना 749 कोटी 53 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर किशोर गटासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या गटात 23 हजार 584 लाभार्थ्यांना 285 कोटी 16 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच तरुण गटासाठी 10 लाख रुपयांपर्यत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार या गटात 9 हजार 460 लाभार्थ्यांना 195 कोटी 18 लाख रुपयांचे असे जिल्ह्यात एकूण 2 लाख 97 हजार 49 लाभार्थ्यांना 1 हजार 229 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश यांनी दिली
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज वाटपात मायक्रो फायनान्स कंपन्या आघाडीवर असून या कंपन्यांनी जिल्ह्यातील 1 लाख 29 हजार 144 लाभार्थ्यांना 349 कोटी 41 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर खाजगी क्षेत्रातील व्यावसायकि बँकांनी 53 हजार 770 लाभार्थ्यांना 235 कोटी 33 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यानंतर छोट्या आर्थिक बँकांनी 40 हजार 938 लाभार्थ्यांना 121 कोटी 84 लाख रुपये, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँकांनी 5 हजार 181 लाभार्थ्यांना 100 कोटी 25 लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाशी संलग्न बँकांनी 1199 लाभार्थ्यांना 47 कोटी 69 लाख रुपये व ग्रामीण क्षेत्रातील बँकानी 348 लाभार्थ्यांना 7 कोटी 83 लाख रुपये कर्जाचे वाटप केले असून या कर्जाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित तरुणांनी आपले स्वत:चे व्यवसाय सुरु केले आहे. तर अनेक तरुण रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराकडे वळाले असून मोठया प्रमाणात छोटे व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात वाढ केली आहे.
Very Good work
Dajibagavhane123@gmail.com
Dajibagavhane123@gmail.com
Hepl
Nice
sir im ravi mahajan i have 200000 lakh lone required to my medical shop with growth of business
I Proude to Government of India.
Thank you so much.
300000/-
Nice
Loan
Nice
vasimtadavi93@gmail.com.tadavi vada faizpur ta yawal.dist jalgaon
vasimtadavi93@gmail.com tadavi vada faizpur ta yaval dist Jalgaon .vyasaek .sekshan HSC
lone aply
I want the loan
guide @ Prdhan mantri mudra yojana