शहराच्या विकास कार्यासाठी झाडे न कापता त्यांचे पुनर्रोपन करा- फिरोज शेख
जळगाव- तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची कदर केली जात नाही? झाडे लावा जीवन वाचवा राज्य सरकारने एक जुलै या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. त्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर वरीलप्रमाणे मेसेज येत आहेत. वाढते तापमान,कमालीचा उकाडा,पाण्याचे दुर्भिक्ष, पावसाची अनिश्चिती या सर्वाला आपणच जबाबदार आहोत.
वृक्ष झाडे आपणास आँक्सिजन देतात,ऑक्सिजन ज्याशिवाय आपण जगू शकत नाही. घरासाठी लागणारे लाकूड सुद्धा याच वृक्षापासून आपणास मिळते. ही झाडे आपल्याला रबर सुद्धा देतात ज्याने टायर बनवले जातात, दळणवळण होते, व्यवहार वाढतो हीच झाडे आपणास घर, दुकाने बांधायला लाकूड देतात. वृक्ष मानवी जीवन चक्राचा एक अविभाज्य घटक आहे.
याच अनुषंगाने मौलाना आझाद फाउंडेशनने झाडे लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश देऊन झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ते विशेषतः कडूलिंबाचे झाडे लावत आहे. कारण कडूलिंबाचे झाड सगळ्या दृष्टीने औषधी आहे. कडूलिंबाचे झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडूलिंब हे अतिउत्तम जंतूनाशक आहे. यामुळे शहरातील विविध ठिकाणी कडूलिंबाचे एक हजार झाड लावण्याचा निर्धार मौलाना आझाद फाऊंडेशनने हाती घेतला आहे. या प्रसंगी उपस्थित संस्थेच्ये अध्यक्ष फिरोज शेख, विकास यावलकर, प्राध्यापक मनोज भालेराव, पत्रकार बाळासाहेब पाटील,गणेश जोशी, चेतन निंबोळकर, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.