जळगाव – बाजर समितीच्या बाजूला असलेल्या सुरेशदादा जैन कॉम्लेक्समधील दुकान फोडून दीड लाखाचा ऐवज लुटून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगवाणी नगर परिसरात राहणारे कमलेश घ्यार वय २५ यांचे सुरेशदादा जैन कॉम्लेक्स येथे कन्हैय्या मोबाईल नावाने दुकान असून स्टेटबँक आणि एअरटेल पेमेंट बॅँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालवीत आहे. घ्यार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि , १ जुलै रोजी दुकान नेहमीप्रमाणे उघडून त्यांच्या मेहुण्यांनी दुकान सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास उघडले. दिवसभरात जमा झालेलं पैसे घेऊन जात आहे का अशी विचारणा केली असता दुकानातील काउंटरला पैसे ठेवण्याचे सांगितले. यानंतर शंसिकांत पाटील हे घरी निघून गेले . २ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शालक निलेश पुष्कर याने फोनद्वारे दुकानातील सामान अस्ताव्यस्थ पडलेले असल्याचे तसेच सीसीटीव्ही फुटेज बघितले असता २ रोजीच्या पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास ३ इसम तोंडाला रुमाल बांधून दुकानाचे शटर उचकावुन आत प्रवेश करून आतील १ लाख २२ हजार ५०० रुपये रोख , मोबाईल्स एकूण १ लाख ३६ हजारांचे चोरटयांनी चोरून नेले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.