जळगाव अँटीकरप्शन विभागाची रात्री कारवाई
जळगाव – जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच मागणार्या तीन जणांना रात्री जळगाव अँटीकरप्शन विभागाने अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की हिंदी सेवा मंडळ यांच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय भुसावळ संस्थेतील कर्मचारी घनश्याम रामगोपाल टेमाणी वय ४० रा.भुसावळ (वरिष्ठ लिपिक) याने एका विद्यार्थ्याला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ४० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित विद्यार्थ्याने याबाबत जळगाव अँटीकरप्शन या विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला.
३ जुलै रोजी घनशाम टेमाने यांनी चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारली असता जळगाव अँटीकरप्शन विभागाने रंगेहात पकडले.या प्रकरणात टेमाने यांना मदत करणारे ललित खुशाल किरंगे वय 42 व्यवसाय खाजगी नौकरी (जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव) रा.वेडी माता मंदिराजवळ विद्यालय नगर भुसावळ, ललित वाल्मीक ठाकरे वय 39 व्यवसाय नोकरी वरिष्ठ लिपिक जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय जळगाव रा. सेंटर बँक कॉलनी पिंप्राळा जळगाव, यांच्यासह तिघांना अँटीकरप्शन विभागाने अटक केली आहे. पोलीस उपाध्यक्ष जीएम ठाकूर पोलीस निरीक्षक निलेश लोधी,सहायक फौजदार रवींद्र माळी,पो.ना. मनोज जोशी,जनार्दन चौधरी, पो.काँ.प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, महेश सोमवंशी,नसीर देशमुख,ईश्वर धनगर यांनी ही कारवाई केली.