पाचोरा – उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकाडे, पीएस आय गणेश चौबे, व वहातुक शाखेच्या पथकाने आज दि. 3 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता बेशिस्त वाहन धारकांना चाप बसण्या करिता अचानक शोध मोहीम करून ज्या वाहानधारका जवळ वाहनाचे कागदपत्रे आढळून न आल्याने तसेच वाहनावर मोबाईल वर बोलने टिपलसीट वाहन चालविणे आशा वाहन धारकावर दंडात्मक कारवाई केली.या कारवाईमुळे पाचोरा पोलिसांचे नागरिकांनी स्वागतच केले आहे.या कारवाई मुळे रोडरोमिओ वर धडकी भरल्याचे समजते तर काही बेशिस्त वाहनधारकांनी आपला मार्ग बदलवुन घेतला. वाहन धारकानी गाडी चालवताना आपले कागदपत्रे जवळ ठेवावी असे आवाहन पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.