जळगाव ; राज्यभरातून एक हजार पत्रकारांची उपस्थिती राहणार
जळगाव – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे येत्या ९ जून रोजी जळगाव येथे १४ वे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रमुख मान्यवर,जेष्ठ पत्रकार यांच्यासह राज्यातून एक हजार पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
याबाबत सविस्तर असे कि,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने प्रथमच जळगाव येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे.सदर अधिवेशन कांताई सभागृह,जळगाव येथे रविवार दिनांक ९ जून २०१९ रोजा दोन सत्रात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यन्त होणार आहे.यावेळी प्रथम सत्रात उदघाटक म्हणून माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे तर अध्यक्ष म्हणून महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत तसेच प्रथम सत्रात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील,माजी मंत्री गुलाबराव देवकर,आ.राजूमामा भोळे,आ.किशोरआप्पा पाटील,आ.चंदुभाई पटेल उपस्थित राहणार.तर द्वितीय सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री ना गिरीशभाऊ महाजन यांची उपस्थिती राहणार आहे.तर प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण मंत्री ना.सौ.पंकजाताई मुंडे,सहकार राज्य मंत्री ना.गुलाबराव पाटील,राज्यमंत्री दर्जा डॉ.गुरुमुख जगवाणी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन,लोकमत चे समूह संपादक राजेंद्र दर्डा,खा.रक्षाताई खडसे,खा.उन्मेषदादा पाटील,जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे,पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने,राज्य संघटक संजय भोकरे यांच्यासह अनेक आमदार व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.
माध्यमाचे बदलते स्वरूप विषयावर चर्चासत्र
प्रथम सत्रात माध्यमांचे बदलते स्वरूप या विषयावर चर्चा सत्रात एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर,मिरर नाऊचे संपादक मंदार फणसे,लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुलकर्णी,पुढारीचे संपादक विक्रांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा जीवनगौरव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण करण्यात येणार असून या वर्षीचा पुरस्कार दैनिक तरुण भारत बेळगाव आवृत्तीचे संपादक किरण ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे.
तरी पत्रकार बांधवानी सदर अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा,जळगाव जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले आहे.