अमळनेर – येथील सबिहाबानो अब्दुल हमीद पठाण यांच्या डिक्कीतून १ लाख ७८ हजारांची रक्कम लांबविणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी कि , ७ जून रोजी सबिहाबानो यांनी ७ जून रोजी युनियन बँकेतुन २५ हजारांची रक्कम काढली होती . तसेच पोस्टातून १ लाख ४८ हजारांची रक्कम काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती . यानंत पाण्याचा जर घेण्यासाठी त्या गेल्या होत्या . मात्र घरी आल्यानंतर डिक्कीतपैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता . याबाबत पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कंजारवाडा परिसरातून गोपाल उर्फ सन्नाटा दशरथ मातले याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली . तसेच त्याच्यासोबत असलेल्या मंगल दिवान गुमाने यालाही पोलिसांनी अटक केली आहे.