मुंबई – भारतातील कृषी व सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2019-20च्या तिसऱ्या तिमाहीचे आणि 31 डिसेंबर 2019 रोजी नऊ महिन्यांचे एकल व एकत्रित निकाल मुंबई येथे नुकतेच जाहीर केले.
(Q3FY20) निकालाची ठळक वैशिष्टये
-
जैन इरिगेशनचे तिसऱ्या तिमाहीचे एकत्रित उत्पन्न (Q3FY20) 1300 कोटी रूपये नोंदवले आणि तोटा 283.8 कोटी रूपये झाला आहे.
-
कर्जदारांंबरोबर ऋण फेडण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
-
2019-20 आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीच्या Q3FY20 मध्ये येणेकऱ्यांकडून येणे असणाऱ्या रकमेत घट झाली.
“कंपनीची स्वयंप्रेरणेने कर्जदारांबरोबर कर्जफेड योजनेसाठी सल्लामसलत चालू आहे. कर्जदार आणि व्यावसायिक सल्लागारांमधील औपचारिक ऋण निराकरण योजना प्रक्रियापण अजून सुरू आहे. नियामक मंजूरीनंतर आणि कर्जदारांच्या अंतर्गत संमतीवर ही प्रक्रिया नजिकच्या भविष्यकाळात पूर्ण होईल. Q3FY20 च्या अखेरीस खेळते भांडवल आणि मुदत कर्ज देणाऱ्या कर्जदारांकडे कंपनीची थकीत देणे रक्कम 525.7 कोटी रुपये आहे. 31 डिसेंबर 2019 अखेरीस कंपनीचे एकल आणि एकत्रित निव्वळ मूल्य (नेट वर्थ) 4444.1 कोटी रुपये आणि 3932.7 कोटी रुपये अनुक्रमे आहे. कर्ज निराकरणाच्या अंमलबजावणीनंतर कंपनीच्या कर्ज व देणी फेडण्याची आणि सगळी इतर कामे सानुकुल करण्याच्या क्षमतेत चांगली सुधारणा होईल. दरम्यान 2020 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाने भविष्यात कंपनीच्या व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण केल्या आहेत आणि आम्ही अल्पभूधारक आणि मोठी शेत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादकतेत आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी कार्यरत आहोत. आमचे आत्ताचे ध्येय हातात असलेल्या ऑर्डर्स पूर्ण करणे आणि खेळत्या भांडवलाच्या क्षमतेत सुधारणा करणे आहे.
– अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.