निषेध : श्री राजपूत करणी सेना जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन
जळगाव – अखंड भारताचे सुपुत्र भारताचे राष्ट्रगौरव विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या सारख्या देशासाठी संपूर्ण जिवन समर्पित करणाऱ्या स्वाभिमानाने जगणाऱ्या महाराणा प्रतापसिंह यांच्या बाबतीत प्राथमिक शाळेच्या इयत्ता सातवीच्या इतिहास व नागरीशास्त्र या पुस्तकतील दुसऱ्या धड्यात शिवकालीन पूर्व भारत या धड्यामधे महाराणा प्रतापसिंह यांच्या बद्दल एकेरी भाषा वापरून उल्लेख केला गेला आहे त्या मुळे संपूर्ण भारत देशातील राजपूत बांधवांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत त्या साठी तिव्र निषेध नोंदविन्यासाठी व सदर पुस्तकतील धडा रद्द होउन दुरुस्त होण्यासाठी सोमवार दि. ०१/०७/२०१९ रोजी सकाळी ११ वाजता मा. जिल्हाअधीकारी जळगाव, यांना श्री राजपूत करणी सेना जळगाव च्या वतीने निवेदन देणार आहे. सदर निवेदन पाठ्य पुस्तक समिति बालभारती,पुणे यांच्या विरोधात असून त्यांचा राजपूत समाज व श्री राजपूत करणी सेना तिव्र निषेद करीत आहे.
तरी सर्व राजपूत समाज, श्री राजपूत करनी सेना व सर्व हिंदू संघटना , सोमवार दि. ०१/०७/२०१९ सकाळी ११ वाज्याला मा. जिल्हाअधिकारी कार्यालय जळगाव येथे निवेदन देणार आहे कृपया सर्व जिल्हा पदअधिकारी, कार्यकारणी सदस्य व राजपूत बांधवांनी मोठ्या संखेने हजर राहावे ही विनंती व श्री करनी सेना तालुका प्रमुखांनी आपल्या तालुक्यावर तहसिलदार यांना या बाबत निवेदन दयावे असे आवाहन श्री राजपूत करणी सेना जिल्हाप्रमुख प्रविणसिंह पाटिल यांनी केले आहे.
मला असे वाटते की हे राजकारणी मुद्दाम राजपूतांच्या भावना दुखवत असेल.
विषमतावादी समाज व्यवस्था देशात माणसा माणसात जात धर्म व त्यांच्या आदर्शचा एकेरी उल्लेख करून द्वेष निर्माण करण्याचे काम करीत आहे. वर्णव्यवस्था नुसार समाज व्यवस्था सुरू व्हावी ही त्यामागची मुख्य भूमिका आहे. भारतीय संविधानाने दिलेली समता,स्वातंत्र्य,बंधुत्व नष्ट करणे हे उद्धिष्ट घेऊन ही राजकीय वाटचाल सुरू आहे ती सर्वच समाजाला देशात हानीकारक आहे.