- जळगावातील मु.जे.महाविद्यालयातील घटना
- महाविद्यालय परिसरात महाविद्यालयाने सुरक्षा रक्षक नियुक्त केलेले असताना देखील घडला अनुचित प्रकार
- लाखो रुपये खर्च करूनही सुरक्षा रक्षक यंत्रणा ठरली फोल
जळगाव – शहरातील मु.जे. महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरुन कबड्डी प्लेअर असणा-या तरूणाचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मृत तरूणाच्या कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड आक्रोश केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती असी एम.जे. कॉलेजच्या पार्कींगमध्ये मोटार सायकल लावण्याच्या किरकोळ वादातून आज दुपारी १:३० वाजेच्या सुमारास मुकेश सपकाळे या तरूणावर चाकून वार करण्यात आले.
जळगाव तालुक्यातील आसोदा येथील रोहित मधुकर सपकाळे (कोळी) वय २१ हा सेतुसुविधा केंद्राचे काम करतो आज आपल्या मोठ्या भावाच्या काँलेज एम.जे. महाविद्यालयात भावाला काही मुलाचे अॅडमीशन घेण्यासाठी कागदपत्रे देण्यासाठी आले असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास तो पार्कींगमध्ये लावलेली आपली दुचाकी काढण्यासाठी आला. तेव्हा गाडी काढण्यावरून त्याचा एका तरूणाशी वाद झाला. यातून धक्काबुक्की करण्यात आली. हे सुरू असतांना रोहित त्या अज्ञात लोकांना विनंती करत होता मला मारु नका माझा भाऊ याच काँलेज मध्ये शिकतो यावेळी हल्लेखोरांनी सांगितले कोणालाही बोलोव आम्ही घाबरत नाही असे बोलल्या नंतर रोहीत ने मोठा भाऊ मुकेशला फोन करुन बोलवले असता तेव्हा समोरच्या तरूणांनी चाकू काढून मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे हा आल्यावर मारहाण करीत याच्यावर चाँपरने सपासप वार केले. व हल्ला करून हल्लेखोर तरूणांनी घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुकेशला भाऊ रोहित व गावातील काही मुलांनी जिल्हा रूग्णालयात १:५० दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पाटील यांनी त्याला मृत्यू घोषित केले.
महाविद्यालयाची सुरक्षा यंत्रणा ठरली “शो पीस”
महाविद्यालयाच्या परिसरात एवढी मोठी घटना घडत असताना महाविद्यालयाने लाखो रुपये खर्च करून सुरक्षा रक्षक नियुक्त केलेले मात्र “शो पीस” ठरल्याचे बोलले जात आहे. महाविद्यालयाच्या पार्किंग सह सर्वत्र सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे.तरी देखील अशी दुर्दैवी घटना घडली याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत देखील चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून मृताच्या आप्तेष्टांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड आक्रोश केल्याने वातावरण भावनिक बनल्याचे दिसून आले. किरकोळ कारणावरून थेट चाकूने वार करण्यात आल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, कॉलेजच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीचे फुटेज तपासण्यात येत असून हल्लेखोर विद्यार्थ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलीसांनी महाविद्यालयाचा परिसर आणि जिल्हा रूग्णालयात बंदोबस्त लावला आहे.यावेळी उप पोलीस अधिक्षक निलाभ रोहन,रामानंद नगरचे सपोनि सचिन ब्रेंद्रे सह एलसीबी स्टँप व स्पेशल कोट स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरातील पोलीस यंत्रणा जोरदार कामाली लागली आहे.