जळगाव ;- शहरातील आशाबाबा नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा वेल्डिंग दुकानासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता विठ्ठल लोहार वय २६ हिचे न्याहळोद ता. धुळे येथे २ जून २०१२ रोजी विठ्ठल लोहार याच्याशी लग्न झाले होते . मात्र माहेराहून वेल्डिंग दुकानासाठी पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता . यासाठी तिला घरातून हाकलून देण्यात आले होते. त्यानुसार विवाहितेच्या फिर्यादीवरून आरोपी पती विठ्ठल लोहार , सासू मीराबाई रामलाल लोहार,सासरे रामलाल लोहार, जेथ सुरेश लोहार.मल्हार लोहार , जेठानी स्वाती लोहार, नणंद सुरेखा लोहार, यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.