जळगाव ;- धुळे शहर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धुलिया मर्चंट्स कमिशन असोसिएशनने शनिवार २९ रोजी बंद पुकारण्याची हाक दिली असून सभापतींना बंद ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे .
यादिवशी येथील आडत व्यापारी खरेदी अथवा विक्री आणि लिलाव करणार नसल्याचे पत्र सभापतींना देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या व्यापाऱयांनी भिंत पाडल्याबाबत बंद पुकारला असून त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी शनिवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.