नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ‘आपला देश आता लोकशाही देश राहिला आहे का’, असा संतप्त सवाल केला आहे. जम्मू-काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अजूनही घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रियांका गांधी यांनी हे विधान केले आहे.
प्रियांका गांधी यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसताना जम्मू-काश्मीर राज्याच्या दोन मादी मुख्यमंत्र्यांना बंदिस्त करण्यात आले आहे. लाखो लोक तेथे अडकले आहेत. हे सगळं असं किती दिवस चालणार हे आम्ही सहा महिन्यांपूर्वी विचारत होतो. आता आम्ही आपल्या देशात लोकशाही आहे का, असे विचारत आहोत.’