पाचोरा, (प्रतिनिधी) येथील शहर व तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकेरी शब्दात अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ आशीष शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची विटंबना करत दहन करण्यात आले.
शिवाजी महाराज चौकात मंगळवार ता 4 रोजी सायंकाळी पुतळा दहन कार्यक्रम झाला. नगराध्यक्ष संजय गोहिल, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, नगरसेवक सतीश चेडे,शहर प्रमुख किशोर बारावकर, पप्पू जाधव, जितेंद्र पेंढारकर, नितीन चौधरी ,पिंटू राजपूत, छोटू चौधरी, शरद पाटील, विशाल पाटील, विजय भोई ,वैभव राजपूत यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
भाजपा व आशिष शेलार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत शेलार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची चपला बुट मारून विटंबना करत शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयापासून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले व त्यांनी शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची विटंबना करत दहन केले. याप्रसंगी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटो =पाचोरा येथे शिवाजी महाराज चौकात आशीष शेलार यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करताना शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.