गावाची पाणी समस्या सुटण्यास होणार मदत,आमदारांच्या हस्ते भूमिपूजन
अमळनेर;- तालुक्यातील मंगरूळ येथे आ शिरीष चौधरींच्या आमदार निधीतून बोअरवेल मंजूर झाल्याने त्याचे भूमीपूजन नुकतेच आमदार चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले,मंगरूळ गाव कायम पाणी टंचाईच्या सावटाखाली राहत असताना हा बोअरवेल गावासाठी आधार ठरणार आहे.
सदर मंजुरीबद्दल ग्रामस्थानी आमदार चौधरी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी प्रा संदीप पाटील, किरण गोसावी, राजेंद्र पाटील,अनिल महाजन, सुनील भामरे, भानुदास पाटील, पांडुरंग पाटील,बापू पाटील,दिलीप पाटील,विशाल पाटील,अमोल पाटील,मनोहर पाटील,विजय पाटील,मिलिंद पाटील,सुखदेव नाईक,गोकुळ पाटील,किशोर पाटील, अशोक पाटील,कल्याण पाटील, पांडुरंग कुंभार, बापू पाटील, सुभाष बागुल ,राजेश पाटील,संदीप पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार चौधरी हे टंचाईग्रस्त गावांना या कलकांतुन बाहेर काढण्यासाठी काहींना काही उपाययोजना करीत असल्याने त्यांची कामगिरी मतदार संघात कौतुकास्पद ठरत आहे.