दुबई: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने राखलेल्या निर्विवाद वर्चस्वाचा फायदा भारतीय संघाला आणि खेलाडूंना झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत केएल राहुल कर्णधार विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा यांनी टी-१० मध्ये दबदबा कायम राखला. फलंदाजांच्या क्रमवारीत तिघा भारतीयांचा समावेश आहे.
न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका भारताने ५-० अशी जिंकली. या मालिकेत भारतीय संघाने फलंदाज, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत शानदार कामगिरी केली. जवळ जवळ प्रत्येक सामन्यात भारताच्या विजयाच महत्त्वाची भूमिका बजावलेला आणि मालिकावीर ठरलेल्या राहुलला आयसीसी टी-२० क्रमवारीत सर्वात मोठा फायदा झाला आहे. राहुलनेच्या क्रमवारीत चार अंकांची वाढ होत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तो ८२३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर अझम ८७९ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.