मुक्ताईनगर – मेगा रिचार्ज योजनेला गती देण्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील खासदार, आमदार, केंद्रीय भूजल मंडळ अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पावसाळी अधिवेशनादरम्यान घ्यावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली. यासाठी त्यांनी गुरुवारी दिल्ली येथे जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील तापी नदीवर प्रस्तावित महाकाय पुनर्भरण योजनेसाठी तापी खोऱ्याचे ऑगस्ट २०१८ मध्ये हवाई सर्वेक्षण करण्यात आले होते. तसेच राज्य सरकारतर्फे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात तापीच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून ८० ते ९० नदी-नाल्यांमध्ये जलपुनर्भरण होईल. त्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणी खासदार खडसेंनी केली.