नवी दिल्ली – यंदा वैयक्तिक करदात्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठा दिलासा दिला आहे. मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा राहावा या दृष्टीनं सरकारनं कर रचनेत बदल करून साडेसात ते दहा लाख उत्पनावर १५ टक्के कर आकारला जाणार आहे.
त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच ते पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्या करदात्यांच्या प्राप्तिकरात कपात केली आहे. त्यानुसार ५ लाखापर्यंत करमुक्त उत्पन्न कायम असून ५ ते ७.५ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के, ७.५ ते १० लाखांवर १५ टक्के, १० ते १२.५ लाखांवर २० टक्के कर आकारला जाणार आहे. मागील वर्षी ५ ते १० लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के, १० ते १५ लाखांवर ३० टक्के होता.