नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करताना आरोग्य क्षेत्रासाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. आरोग्य क्षेत्रातील ६९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे ६ हजार ४०० कोटी रुपये देखील आहेत.
पीएम जनआरोग्य योजनेंतर्गत २० हजारांहून अधिक रुग्णालये आहेत, त्यात वाढ करणार ‘मिशन इंद्रधनुष’चा अवाका वाढवून त्यात १२ आजारांचा समावेश केला आहे. त्यात पाच नवीन लसीकरणांचा समावेश केला आहे. पंतप्रधान जनआरोग्य योजनेशी २० हजारांहून अधिक रुग्णालये जोडली गेली आहेत. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थींवर उपचार केले जातात. पीपीपी तत्वावर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जोडणार असून,केंद्र सरकार पुढाकार घेणार