जळगाव ;- तालुक्यातील भादली येथे एकाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत नशिराबास पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी कि , नरेंद्र मुरलीधर नारखेडे वय ४० रा. भादली ता. जळगाव हे बाफना ज्वेलर्समध्ये कमला असून त्यांनी नैराश्यातून २७ जून रोजी ९ वाजेच्या सुमारास फिरून येत असल्याचे सांगत निघून गळे . मात्र ते परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह हा रुळाच्या बाजूला पडलेला आढळून आला . याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.