जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात अकोला येथील ५५ वर्षीय रूग्णावर गॅस्ट्रो सिस्टोटॉमीची शस्त्रक्रिया शल्यचिकीत्सकांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी ठरली. शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला अवघ्या आठवडाभरातच रूग्णालयातुन सुटी देण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, अकोला येथील रहिवासी असलेले मिलींद बोदडे (वय ५५) या रूग्णाच्या स्वादुपिंडात गाठ होती. त्यामुळे त्यांना सतत पोट दुखणे, जेवण न जाणे असा असह्य त्रास जाणवत होता. त्यांनी अनेक ठिकाणी दाखवुनही आजाराचे निदान होत नव्हतेे. अळेर त्यांच्या परिचीतांनी त्यांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाविषयी माहिती दिली. मिलींद बोदडे यांनी तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालय गाठले. याठिकाणी शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी त्यांची तपासणी केली. तपासणीत स्वादुपिंडाला गाठ असल्याचे निदान करण्यात आले. निदानानंतर मिलींद बोदडे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रूग्णाची आर्थिक परिस्थीती बेताचीच असल्याने त्यास रूग्णालयात उपलब्ध असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवुन देण्यात आला. या योजनेंतर्गत शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील व सहायक डॉ. महेश चौधरी,भुलतज्ञ दिनेश ललवाणी यांनी मिलींद बोदडे यांच्या अग्नाशयाला असलेली १७ सेमी ु १२ सेमी ु १३ सेमी ची गाठ मोकळी करण्यात यश आले. शल्यचिकीत्सकांच्या प्रयत्नामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. तसेच आठवडाभरात रूग्णाची रूग्णालयातुन सुटी देखिल करण्यात आली. मिलींद बोदडे यांनी रूग्णालयाचे आणि डॉक्टरांचे ऋण व्यक्त केले.
जीवघेण्या आजारातुन प्राण वाचले – मिलींद बोदडे
गेल्या अनेक दिवसांपासुन पोटात असह्य दुखणे जाणवत होते. अनेक ठिकाणी दाखवुनही योग्य उपचार मिळत नव्हते. अशावेळी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची माहिती मिळाल्यानंतर मी याठिकाणी आलो. या रूग्णालयात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक स्वरूपाच्या आरोग्याच्या सुविधा आणि डॉक्टरांनी वाढविलेला आत्मविश्वास यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि जीवघेण्या आजारातुन माझे प्राण वाचल्याचे मिलींद बोदडे यांनी सांगितले.