जळगाव: वनस्पतींची रचना आणि कार्य यांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी व कायमस्वरूपी ते लक्षात राहावे यासाठी प्रगती विद्यामंदिरात प्रात्यक्षिकातून माहिती दिली.मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग घेऊन सातवीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातील प्रकरण वनस्पतींची रचना आणि कार्य याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून माहिती दिली.
वनस्पतीचे भाग मूळ,खोड पान,फुल,फळ,इ भाग विद्यार्थ्यांना माहित होते पण अधिक माहिती म्हणून मुळाचे प्रकार शिकविण्यात आले. मुळाचे मुख्य दोन प्रकार म्हणजे सोटमूळ आणि तंतुमय मूळ याविषयी अधिक माहिती देत त्या दोघांमधील फरक प्रत्यक्ष अनुभवातून दाखवण्यात आले.सोटमूळ यातील भाग प्राथमिक मूळ,उपमूळ,मूलरोम,मुलाग्र आणि मुलटोपी या भागांची अधिक माहिती त्यांना प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवण्यात आली.या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत होता.मुलांना अतिशय नाविन्यपूर्ण हा उपक्रम जाणवत होता.असा हा नाविन्यपूर्ण उपक्रम मनोज भालेराव यांनी घडवून आणला.