जळगाव ;- जळगावातील रेशन दुकानांवर लाभार्थ्याना स्वस्त धान्य मिळत नसून वेळेवर दुकाने न उघडी झाल्याने आणि काही दुकानदार हे लाभार्थ्यांना धान्य देत नसून त्यांना ते वेळेवर उपलब्ध व्हावे ह्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आरंभिले आहे.
गरीब गरजूना धान्य उपलब्ध व्हावे या मागणीसाठी शांताराम अहिरे आणि भीमराव सोनवणे या दोघांनी विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाची बसले असून मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.