जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण शास्त्र संचालक प्रा.सचिन एन. झोपे यांना नुकतीच दि.२५ जून रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी पीएच.डी. प्रदान केली
. प्रा.सचिन झोपे यांनी ‘प्रसार माध्यमांचा खेडाळूंवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांचे रजिस्ट्रेशन २०१३ रोजी झाले होते. गेली ५ वर्ष त्यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ४२० खेडाळूंचा सर्वेक्षण पध्दतीने सर्वे करून त्यांनी पीएच.डी केली. त्यांना व्ही.एस.वांगवाड (पुणे) यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ.पी.आर.चौधरी,अमोल चौधरी,प्रा.एस.पी.पाटील,डॉ.आर.व्ही.भोळे यांचे सहकार्य लाभले. .