अमळनेर : येथील अर्बन को ऑप बँकेच्या चेअरमनपदी पंकज गोविंद मुंदडा व व्हा. चेअरमनपदी प्रवीण रामलाल जैन यांची बिनविरोध निवड दि. २६ रोजी संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली. या निवडीनंतर हितचिंतकांनी फटाके फोडून जल्लोष केला. .
बँकेचे मावळते चेअरमन लालचंद सैनानी व व्हा. चेअरमन वसुंधरा लांडगे यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी मुंदडा व जैन यांना संधी देण्यात आली. अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित निवड सभेस अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जी. एच. पाटील उपस्थित होते. त्यांना सहकार अधिकारी सुनील माळी यांचे सहकार्य लाभले. यावेळी चेअरमनपदी पंकज मुंदडा व व्हा. चेअरमनपदी प्रवीण जैन यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेस मावळते चेअरमन लालचंद सैनांनी,संचालक प्रदीप अग्रवाल,भरत ललवाणी,शांताराम ठाकूर,दीपक साळी,मोहन सातपुते,प्रवीण पाटील,सौ. वसुंधरा लांडगे,सौ. निकम,तज्ज्ञ संचालक रमाकांत माळी सह आदी उपस्थित होते. निवडकामी बँकेचे मॅनेजर अमृत पाटील यांचे सहकार्य लाभले.