पहिल्या दीड किलोमीटरचा १६ रुपये लागणार
जळगाव ;- शहरात आतापर्यंत रिक्षाचालकांच्या संघटनांच्या धोरणानुसार शेअरिंग रिक्षांची भाडे आकारणी होत होती . आणिबाणिच्याप्रसंगी भाडे ठरवून रिक्षेने जाण्यासाठी रिक्षाचालक सांगेल तेवढे भाडे द्यावे लागत होते . मात्र यापुढे राज्य परिवहन प्राधिकरणाने शहरात रिक्षांना मीटरची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात पहिल्या दीड किमी साठी १६ रुपये तीन प्रवाशांसाठी भाडे आकारणी करण्यात येईल अशी माहिती या मागणीचा पाठपुरावा करणारे माहिती अधिकर कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी दिली .
दीपक गुप्ता पुढे म्हणाले कि, या मुद्द्यावर राज्य परिवहन प्राधिकरणाचे २०११ साली बैठक झाली होती . त्यानंतर काहीच झाले नाही . शहरातील रिक्षेने प्रवास करणाऱ्या लोकांना रिक्षाचालकांची मनमानी सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता . परिवहन खात्याकडून तात्काळ कारवाईची भूमिका घेतली जात नसल्याने रिक्षा चालकांच्या संघटना सुद्धा भाडे आकारणीसाठी नियमांची भाडभीड ठेवत नव्हत्या. १२ जूनला राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली . त्या बैठकीत जळगावा शहरातील या परिस्थितीचा विचार व निर्णय व्हावा म्हणून आपण पाठपुरावा करीत होतो . राज्य परिवहन प्राधिकरणाच्या या निर्णयाबद्दल रिक्षाचालकांच्या संघटनांना सूचना देण्यात अली असून यापुढे १६ वर्षांनंतरच्या रिक्षानंही शहरात परवाने दिले जाणार नाही .
शहरात रिक्षांशिवाय शहर बससेवेसारखी पर्यायी व्यवस्था नसल्याने परिवहन खाते व पोलिसानांही मनमानी करणाऱ्या रिक्षाचालकांवर अंकुश ठेवता आला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे शहरात रिक्षांना मित्र सक्ती असावी व मनपा किंवा एसटी महामंडळाने शहर बस सेवा सुरु करावी यासाठी आपण २०१६ सालापासून पाठपुरावा करीत आहोत .मनपा किंवा एसटी महामंडळाकडून समाधानकारक भूमिका घेतली गेली नाही तर दाद मागण्यांसाठी उच्च न्यायालयात जनहितवादी याचिका दाखल करणार आहोत असेही दीपक गुप्ता यांनी सांगितले.
शहरात आता पहिल्या दीड किमीच्या नंतरच्या प्रत्येक किमीसाठी १० रुपये ९० पैसे भाडे आकारणी केली जाणार आहे. या निर्णयाबद्दल दीपक गुप्तां यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही , सहायक परिवहन अधिकारी किरण मोरे, पोलिसांच्या शार वाहतूक शाखेचे देविदास पुनगर यांचे आभार मानले.