जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम गुरुवारपासून बंद
जळगाव ;- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी तलाठ्यांना सहकार्य म्हणून डाटा कलेक्शनचे काम करत असलो तरी तो डाटा अपलोड करून महसूल खात्याचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली नाही असे फैजपूरचे प्रांताधिकारी यांना समक्ष व जिल्हाधिकाऱ्यांना मोबाईलवरून सांगणाऱ्या ग्रामसेवकाला जिल्हाधिकाऱ्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा व निलंबित करण्याची धमकी दिल्याचा आरोप ग्रामसेवकांच्या संघटनेने केला आहे . या संघटनेने जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली . त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे गुरुवारपासून काम बंद आंदोलन करू असे संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामदे यांनी सांगितले.
चिखली ता. यावल येथील ग्रामसेवक पी. व्ही. तळेले याना मौजे पाडळसे ता. यावल येथील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे कामकाज का करीत नाही याबाबत विचारणा करून काही एक एकूण न घेता एकेरी भाषेचा वापर करून शिवीगाळ आणि दमदाटी करून नोकरीवर काढून टाकण्याची धमकी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप तळेले यांनी केला आहे. त्यांना याचा मनस्ताप झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असेही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले .
पालक अधिकारी म्हणून ग्रामसेवकाची ज्या गावात नेमणूक आहे त्यागावाशिवाय अन्य गावांच्या डाटा कलेक्शनचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बळजबरीने सांगितले तरी मान्य करू नये,अशा आशयाचे संघटनेचे पत्र संबंधित व्हाटसप ग्रुपवर का व्हायरल केले या मुद्द्यावरूनही या ग्रामसेवकाचा आधी फैजपूरच्या प्रांतांशी वाद झाला होता . राज्यभरात या कामासाठी महसूल खात्याकडून विनाकारण दडपण आणून डाटा अपलोड करण्याची जबाबदारी दिली जात असल्याचे ग्रामसेवकांच्या संघटनेचे म्हणणे आहे . लोकसभा निवडणुकीपूर्वी ग्रामसेवकांनी जवळपास सत्तर टक्के डाटा कलेक्शन केले आहे . तेच अपलोड करण्याचे काम महसूल खाते अद्यापपर्यंत करू शकले नाही . असे असले तरी ग्रामसेवकांवर मात्र सक्तीने कामासाठी दबाव टाकला जातो , शेतीशी संबंधित लाभाची योजना असल्याने त्या त्या गावांमध्ये शेतकऱ्यांची इत्यंभूत माहिती महसूल खात्याकडे म्हणजे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे असते आणि अस्यायला पाहिजे त्यामुळे ती अद्ययावत करण्याचे काम आणखी सोपे होईल . त्या तुलनेत या माहितीच्या संकलनात स्वाभाविकपणे ग्रामसेवक कमी पडू शकतात . प्रत्येक गावची माहिती अद्ययावत ठेवण्याची पूर्ण जबाबदारी ग्रामसेवकाचीच आहे , अशी अपेक्षा महसूल खाते का ठेवते आहे ,असा प्रश्नही ग्राम सेवकांच्या जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या भेटीत उपस्थित केला होता.
दरम्यान सीओंच्या भेटीनंतर ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते . मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकला दिलेल्या शिवीबद्दल काहीच न बोलता उलट ग्रामसेवकाला नीट काम करायला सांगा असे उत्तर दिले असून सन्घटनेच्या राज्य सरचिटणिसांनी गुरुवार पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम बंद ठेवण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.