उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांचा ठिय्या
शिरसोली ;- शिरसोली प्र न गावातील सेवक एस . व्ही पाटिल हे सतत ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहत नाहीत . अंदाजे 20 ते 25 हजार वस्तीचे गांव असून गावातील नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ स्वच्छ भारत अभियान (अन्तर्गत )शौचालय आदी ग्राम पंचायतमध्ये पाहणी कामी ग्रा.वि.अधिकारी उप्लब्ध नसतात .म्हणुन गावातील ग्रामस्थांनी एकत्र येउन ग्रामपंचायत कार्यालयमधील ग्रा.वि .अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला फुलाचा हार टाकून संताप व्यक्त केला.अशा प्रकारे अनेक ग्रामस्त शासकीय योजने पासुन वंचित राहु शकतील या गोष्टीला सर्वस्वी ग्रामविकास अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला .
यावेळी पंडित पाटील,फकिरा बारी,महादू जाधव,सोनू वाणी, विठ्ठल वाणी , विठ्ठल जाधव,सौरभ वाणी वसंत फुगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्ये उपस्थित होते.