जळगाव ;- पिंप्राळा भागातील मयूर कॉलनीत आज सकाळी अज्ञात व्यक्तीने एका १५ वर्षीय मुलाला पळवून घेऊन गेल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे. मात्र त्याच्याजवळ दप्तर आणि दोन ड्रेस आढळून आले नाही . मात्र तो घरातून निघून गेला कि कोणासोबत निघूं गेला याबाबत पुष्टी होऊ शकली नाही
याबाबत माहिती अशी कि, मयूर कॉलनीत राहणाऱ्या अशोक गोकुळसिंग राजपूत वय ४० हे सिक्युरिटीचे काम करतात . आज पहाटे ५ वाजता कामावर जाणयासाठी निघाले असता त्यांचा मुलगा जयेश राजपूत हा घरात दिसून आला नाही. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही . त्यामुळे त्यांनी रामानंद पोलीस स्टेशनला धाव घेत अज्ञात व्यक्तीने मुलाला पळवून नेल्याची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश भावसार तपस करीत आहे.