जळगाव — येथील डॉ उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाच्या केळीला अल्पावधीतच संपुर्ण भारतातून मागणी निर्माण झाली असून १५ टनची पहिली बॅच आज उत्तरप्रदेशसाठी रवाना करण्यात आली.
यावेळी गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष वासुदेव पाटील, गोदावरी लक्ष्मी को ऑप बँक ली चे संचालक राजू शिवराम महाजन, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ व्ही एच पाटील, प्रा एन जी चौधरी, उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पाटील, संचालक प्रा सतिष सावके, डॉ उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, आशिष भिरूड व्यवस्थापक अशोक ब—हाटे, गणेश पाटील, पियुष भंगाळे, देविदास महाजन, रामदास पाटील, नाना सावके,सुनिल सावके, अतुल बोंडे,दिगंबर राणे इ मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी ए टी राव गुरूजीच्या उपस्थीतीत यावेळी गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष वासुदेव पाटील, गोदावरी लक्ष्मी को ऑप बँक ली चे संचालक राजू शिवराम महाजन,श्रीमती गोदावरी पाटील, डॉ. वर्षा पाटील यांचे हस्ते पूजा करण्यात आली.माजी खा. डॉ उल्हास पाटील, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, एनपूर येथील व गोदावरी बँकेंचे संचालक, प्राचार्य डॉ एस एम पाटील, संचालक सतिष सावके,यांच्या मार्गदर्शनानुसार जैन टीश्यु कल्चरचे ग्रँड ९ उत्पादन ११ व्या महिन्यातच घेण्यात आले आहे. गेल्या ११ महिन्यापासून परिसरातील केळी व्यापा—यामध्ये कृषि महाविद्यालयाच्या गोलाई, रंग, चांगली रास या केळीची चर्चा आहे. यामूळे सर्वप्रथम खरेदीचा मान सर्वोदय केला गु्रप एनपूर यांना मिळाला आहे. यागु्रपच्या माध्यमातून आज १५ टनची पहिली बॅच ब—हाणपूर बोर्डावर रवाना करण्यात आली.
चांगल्या प्रतिची केळीमूळेच व्यापारीवर्ग आर्कषीत — राजू शिवराम महाजन
जैन टिश्यु कल्चरची रोपाची लागवड केल्यानंतर अल्पावधीतच गेालाई रंग आकार, घड यामूळे ग्रँन्ड ९ उत्पादनाचे आर्कषण पहिल्यापासूनच व्यापा—यामध्ये होते. अनेक व्यापा—यांनी जागेवर पाहणी केल्यानंतर या केळीला मागणी घातली होती.तसेच अनेक ठीकाणी याचे सँपल पाठवले होते. याकेळीची चर्चा बाजारात होउ लागली आहे. चांगल्या प्रतिची केळी असल्याने व्यापारी वर्ग आकर्षीत झाला असल्याचे राजू महाजन यांनी सांगीतले.