औरंगाबाद – शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत केला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा केला. यावेळी गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांचे शहरात आगमन झाले. तेव्हा शिवसैनिक आणि सामान्य नागरिकांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. औरंगाबादेत महाएक्सपोचे उद्घाटन करण्यासोबतच ठाकरे शहरातील विकासकामांचा देखील आढावा घेत आहेत. महाएक्सपो कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्तालय, महापालिका दौरा आणि इतर कामांचा आढावा घेणे असे त्यांच्या दौऱ्याचे नियोजन आहे.