जळगाव – सात वर्षीय बालिकेला तिच्याच वडीलांनी गिरणा नदीच्या पुलावरून फेकल्याची घटना गुरूवारी दुपारी 12 वाजता उघडकीस आली. कोमल संदीप चौधरी (वय 7 वर्ष) असे मृत बालिकेचे नाव आहे. संदीप चौधरी व त्यांची मुलगी कोमल हे दोघेही बुधवारी रात्रीपासून बेपत्ता होते. गुरूवारी दुपारी गिरणा पुलाखाली लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान मृत कोमलचे वडील संदीप चौधरी याला पारोळा येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे संदीपनेच आपल्या मुलीला गिरणा नदीवरील बांभोरी पुलावरून फेकल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान पोलिस तपास करत आहेत.