नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आयएस’च्या च्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. वजीराबादच्या चकमकीनंतर तिघा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. या तिघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.