केरळमधील त्रिशूर शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री १२.३० वाजता पुथुक्कड पोलीस ठाण्यात एक २५ वर्षीय तरुण हातात बॅग घेऊन पोहोचला आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी पोलिसांचेही पाय थरथरले.
पोलीस अधिकाऱ्यांनी बॅगबाबत चौकशी करताच, त्या तरुणाने थेट बॅग त्यांच्या हाती दिली. बॅग उघडताच त्यामध्ये अज्ञात बाळांच्या हाडांचे अवशेष आढळले. पोलीस तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे.
या तरुणाचे नाव भाविन असून तो अनीशा नावाच्या २२ वर्षीय तरुणीशी गेली पाच वर्षे प्रेमसंबंधात होता. त्यांचा विवाह झाला नव्हता. दरम्यानच्या काळात अनीशा दोन वेळा गर्भवती राहिली आणि दोन्ही वेळा नवजात बाळांचा मृत्यू झाला, मात्र मृत्यू निसर्गिक होता की हेतुपुरस्सर, हे तपासात उघड झाले.
पहिल्या बाळाचा जन्म नोव्हेंबर २०२१ मध्ये झाला होता. अनीशाने दावा केला की बाळ मृत जन्माला आले, पण शवविच्छेदन अहवालातून बाळाला जन्मानंतर मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्याचा मृतदेह घराच्या अंगणात गुप्तपणे पुरण्यात आला होता. काही महिन्यांनी अनीशाने तो सांगाडा बाहेर काढून भाविनला दिला.
दुसऱ्या घटनेत, ऑगस्ट २०२४ मध्ये अनीशाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आणि दुसऱ्याच दिवशी ते बाळही संपवण्यात आले. या वेळेस बाळाचे अवशेष भाविनने आपल्या घराच्या बागेत गुपचूप पुरले. नंतर तेही बाहेर काढून त्याची हाडं सुरक्षित ठेवली गेली.
भाविनच्या सांगण्यानुसार, त्याने अनीशाला ‘धार्मिक कारणासाठी’ हाडं जपून ठेवायला सांगितली होती. पण प्रत्यक्षात त्याचा उद्देश वेगळाच होता – तो या अवशेषांचा वापर करून अनीशाला ब्लॅकमेल करत होता. जेव्हा अनीशाने संबंध तोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भाविनने हे पुरावे दाखवून तिला धमकावले.
या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा भाविनने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन केला. त्याने बॅगमध्ये मुलांचे सांगाडे आणले आणि संपूर्ण गोष्ट उघडकीस आणली. पोलिसांनी अनीशालाही ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक आणि डिजिटल तपासाद्वारे गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याचे काम सुरू आहे.
ही घटना केवळ एक गुन्हा नसून, प्रेमातील फसवणूक, मानसिक छळ, आणि निर्दयतेची काठ गाठणारे प्रकरण आहे. दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आणि त्यामागे प्रेम, धोका, आणि ब्लॅकमेलसारख्या गुंतागुंतीच्या भावनांचा अंधार
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!
“Thackeray Comeback” महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ!
रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा
पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी