भारतामध्ये सोने खरेदी करण्याची परंपरा केवळ आर्थिक गुंतवणुकीपुरती मर्यादित नाही, तर ती सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्वाची आहे, विशेषत: धनत्रयोदशी आणि दिवाळी, गुढीपाडव्यासारख्या शुभ दिवसांमध्ये सोनं खरेदीला सराफ बाजारात मोठी गर्दी होते दरम्यान नुकतेचं गुढीपाडव्यानिमित्त अनेकांनी सोने खरेदी करतांना सोन्याच्या भावात तेजी दिसली काहींना अशी अपेक्षा होती की गुढीपाडव्यानंतर सोन्याचे भाव कमी होतील.मात्र तसं काही झालं नाही उलट सोने पुन्हा एकदा तेजीत आले. पाडव्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोने 1,000 रुपयांनी महागले. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे भाव १ लाखाच्या वर जातील याबद्दल चर्चा सुरू आहे.
सोन्याच्या भावाचा वाढता आलेख
जर सोन्याचे भाव असेच वाढत राहिले, तर अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याचा भाव प्रति तोळा एक लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. तर, सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहत आहेत. अनेक देश त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ करत असल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. युरोपियन देशांतील महागाई आणि अमेरिका, चीन यांसारख्या देशांतील आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्याची मागणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
-
सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी:
- हॉलमार्क तपासा: सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (HUL) असणे आवश्यक आहे, जेणेकरून सोन्याची शुद्धता सुनिश्चित करता येते.
- नावाजलेल्या दुकानांना प्राधान्य द्या: नावाजलेल्या दुकानांमध्ये सोने खरेदी करणे अधिक सुरक्षित असते.
- बिल आणि पावती घ्या: सोन्याची खरेदी करताना बिल आणि पावती घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही समस्या झाल्यास पुरावा म्हणून उपयोगी ठरू शकेल.
- सोन्याच्या दराची माहिती घ्या: सोन्याच्या दराची माहिती घेणे आणि त्याप्रमाणे मोलभाव करणे आवश्यक आहे.
- गुंतवणुकीसाठी योग्य वेळ निवडा: सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ निवडणे आवश्यक आहे, जेणेकरून चांगला नफा मिळू शकेल.
- हॉलमार्क तपासा: सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (HUL) असणे आवश्यक आहे, जेणेकरून सोन्याची शुद्धता सुनिश्चित करता येते.