अनेकदा एखादा व्यवसाय करण्याची मनात इच्छा असूनही पैसे नसल्यामुळे व्यवसाय करता येत नाही, परंतु आम्ही तुम्हाला आज पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या बिझनेस आयडिया सांगणार आहोत.
1. ऑनलाइन ट्यूशन किंवा क्लासेस : मुलांचे कितीही चांगल्या शाळेत ऍडमिशन असले तरी शाळेतून घरी आल्यावर ट्युशन लावण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला असतांना तुम्ही ऑनलाईन ट्युशन किंवा क्लासेस सुरु करा. तुम्हाला कोणताही विशिष्ट विषय किंवा कौशल्य असल्यास, ऑनलाइन ट्यूशन देणे एक चांगला पर्याय असू शकतो. उदा. गणित, इंग्रजी, संगीत किंवा कलेचे शिकवण.
जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!
१२वी नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!
ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक ; मुलींना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!
2. फ्रीलांस लेखन किंवा कंटेंट क्रिएशन: जर तुम्हाला लेखनाची आवड असेल, तर आपल्याला वेब साईटसाठी किंवा ब्लॉगसाठी लेख लिहिण्याची संधी मिळू शकते.आज डिजिटल युगात वावरत असतांना सोशल मीडिया, डिजिटल मीडिया क्षेत्राला मोठा स्कोप निर्माण झाला आहे. टेम्पलेट्स, ईबुक किंवा ब्लॉग तयार करणे, स्वतःची वर्डप्रेस वेबसाईट सुरु करून स्वतःचा किफायतशीर व्यवसाय सुरु करता येऊ शकतो.
3. पर्सनल ट्रेनिंग किंवा फिटनेस कोचिंग:बदलत्या काळानुसार मानवाच्या जीवन शैलीत प्रचंड बदल झाला असून आहार, दैनंदिनीमुळे अनेकांना आपलं फिटनेस राखण्यास वेळ मिळत नाही अशा वेळेस फिटनेस गुरुची आवशकता भासते त्यामुळे तुम्ही फिटनेस किंवा योगा शिकविणे, प्राचीन तंत्रज्ञान वापरून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे मार्गदर्शन करणे हा उत्तम व्यवसाय करू शकता.
4. गृह उद्योग: घरच्या घरी छोटे उत्पादन तयार करणे. उदाहरणार्थ, हाताने तयार केलेली वस्त्र कला, नॅचरल सोप्स, कॅन्डल्स किंवा चॉकलेट्स, पापड इत्यादी असे अनेक उद्योग आहेत की ते तुम्ही कमी पैशात करून उत्पादन खरेदीसाठी लोकांना आकर्षित करू शकता.
5. सोशल मीडिया मॅनेजमेंट: जर आपल्याला सोशल मीडियाचा अनुभव असेल, तर लहान व्यवसायांच्या सोशल मीडिया खात्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम सुरू करू शकता.
6. दुरुस्ती आणि रिपेयरिंग सेवा: घरात विविध उपकरणांची दुरुस्ती किंवा तांत्रिक मदत देणे. उदाहरणार्थ, मोबाईल रिपेअर, इलेक्ट्रिकल उपकरणांची दुरुस्ती, इ.
7. ब्लॉग किंवा व्ह्लॉगिंग – जर तुम्हाला लेखन किंवा व्हिडीओ तयार करणे आवडत असेल, तर तुम्ही ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनल सुरु करू शकता. यात पैसे कमवण्यासाठी तुम्हाला अॅडसेंस, स्पॉन्सरशिप किंवा अफिलिएट मार्केटिंगचा वापर करावा लागेल.
8. ऑनलाइन सर्व्हे किंवा डेटा एंट्री – अनेक कंपन्या आणि सर्व्हे प्लॅटफॉर्म्स लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी पैसे देतात. यासाठी जास्त निवेशाची आवश्यकता नाही.
9. सोशल मीडिया मॅनेजमेंट – जर तुम्हाला सोशल मीडियावर काम करणे आवडत असेल तर, तुम्ही इतर लोकांच्या किंवा कंपन्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सचे व्यवस्थापन करू शकता.
10. प्रूफरीडिंग किंवा संपादन – तुमच्याकडे उत्तम लिखाण कौशल्य आहे का? मग, तुम्ही लेख किंवा दस्तऐवजांची प्रूफरीडिंग आणि संपादन करू शकता.
हे काही व्यवसाय आहेत जे तुम्ही पैसे न लावता सुरू करू शकता, यासाठी तुमच्याकडे केवळ योग्य कौशल्ये आणि वेळ असावा लागेल.