मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवून गैरकृत्य केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यात घडली आहे. इथं एका नराधमाने शीतपेय पाजण्याचा बहाणा करून तीन मुलींना ट्रिपलसीट गाडीवर बसवून शेतात घेऊन गेला व मोबाईल मध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून मुलींसोबत अत्यंत धक्कादायक आणि भयावह गैरकृत्य केले घटनेने खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना वाढत आहे. आरोपीने मुलींचा गैरफायदा फायदा घेऊन अशा प्रकारचे विकृत कृत्य केले, हे निश्चितच मानवी नैतिकतेला काळिमा फासणारे आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!
१२वी नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!
ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.अनिल लांडगे महाराज असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तो लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. याच गावात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींना आरोपीनं कोल्ड्रिंक्स पाजण्याचं आमिष दाखवलं. यानंतर तो तिघींना दुचाकीवर बसवून आपल्या शेतात घेऊन गेला. याठिकाणी आडबाजुला घेऊन जात आरोपीनं तिन्ही मुलींना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यांची छेड काढत अश्लील कृत्य केले.
घटनेनंतर मुली घाबरलेल्या अवस्थेत घरी परतल्या
या प्रकारानंतर तिन्ही मुली घरी परतल्या. यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. मुलींसोबत घडलेलं कृत्य ऐकून पीडित मुलींचे कुटुंबीय हादरले. त्यांनी तातडीने देवणी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना मुलींसोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
ही एक अत्यंत धक्कादायक आणि भयावह घटना आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना वाढते. आरोपीने गैरफायदा घेऊन तीन मुलींवर अशा प्रकारचे विकृत कृत्य केले, हे निश्चितच मानवी नैतिकतेला काळिमा फासणारे आहे. या घटनेतून समाजाला एक महत्त्वाचा संदेश मिळतो की, आपल्या मुलांवर आणि तरुणींवर सतत लक्ष ठेवणे, त्यांना सुरक्षित ठेवण्याची काळजी घेणं आवश्यक आहे.तसेच, आरोपीला कडक शिक्षा मिळावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सरकार आणि कायदा यंत्रणांनीही यावर त्वरित कारवाई केली पाहिजे अशी मागणी होतं आहे.