असोदा /जळगाव प्रतिनिधी दि. 30 – असोदा येथे विश्वकर्मा समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भव्य विश्वकर्मा मंदिराचे भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव उद्योजक विक्रम गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.*
या प्रसंगी विक्रम पाटील यांनी आपल्या मनोगतात “विश्वकर्मा समाज हा परिश्रम, गुणवत्ता आणि कुशलतेचा मूर्तिमंत आदर्श आहे. या मंदिराच्या उभारणीमुळे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकजुटीलाही बळ मिळेल. समाजाच्या उन्नतीसाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी पालकमंत्री महोदय आणि आमचा परिवार नेहमीच प्रयत्नशील राहू.” असे प्रतिपादन केले.
या भव्य सोहळ्याला श्री विश्वकर्मा बहुद्देशीय विकास मंडळ अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते व पं. स. सदस्य पती तुषार महाजन, युवा सेना तालुकाप्रमुख अजय महाजन, वि.का.सोसाचे चेअरम बापू महाजन, उपसरपंचपती गिरीश भोळे, ग्रा.पं. सदस्य जीवन सोनवणे, दुर्गादास भोळे, उमेश बाविस्कर, लखन जोहरे, सुनील पाटील, सर्वोदय एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अनिल महाजन, बाळकृष्ण पाटील, हरीश भोळे, अनिल कोळी, किशोर चौधरी, शरद नारखेडे, पिंटू कोळी, दीपक माळी सतीश डोळसे, रामचंद्र कोळी, संजय बिऱ्हाडे, चंदन बिऱ्हाडे, संजय कोळी, ललित कोळी, कैलास चौधरी, महेंद्र कोळी, गोटू नारखडे विश्वकर्मा बहुद्देशीय विकास मंडळ उपाध्यक्ष अरुण नामदेव शिंदे, सचिव भागवत पुंडलीक साळुंखे खजिनदार अंकुश पाटील, वसंत खैरनार, भगीरथ साठमोहन, पद्माकर साळुंखे, तुकाराम पाटील, प्रकाश पाटील, योगेश मिस्तरी, सचिन साळुंखे, नितेश कापडे, राहुल वडसत्ते समस्त विश्वकर्मा समाज बांधव व आसोदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.