कडक उन्हाळा सुरु झाला आहे.तापमानाचा पारा चढत असतांना अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पार जाऊन पोहचले आहे. यामुळे उकाड्याने अंगाची ल्हाईल्हाई होतं असल्याने नागरिक बचावासाठी विविध पद्धतींचा वापर करत आहेत. यात काही लोक थंड पेय किंवा आईस्क्रीम (ice cream) खाऊन शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उन्हाळ्यात आईस्क्रीम (ice cream) खायला आवडते हे खरं असलं तरी आईस्क्रीम (ice cream) खातांना आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे.शरीराला थंडावा मिळण्यासाठी आइस्क्रिम, कोल्ड ड्रिंकचे सेवन केले जाते. पण मार्केटमध्ये सध्या आइस्क्रिमपेक्षा फ्रोजन डेझर्टची (dessert)अत्याधिक विक्री होत असल्याने आईस्क्रीम (ice cream) खाणे चिंतेचा विषय बनला आहे.त्यामुळे यापुढे आईस्क्रीम खरेदी करण्यापूर्वी व आपल्या लहान बाळांना खायला देण्यापूर्वी आईस्क्रीम आहे फ्रोजन डिझर्ट आहे तपासणे आवश्यक आहे.आइस्क्रिम (icecream) आणि (dessert) फ्रोजन डेझर्टमधील फरक जाणून घेऊया. याशिवाय फ्रोजन डेझर्ट (dessert) खाल्ल्याने काय नुकसान होते हे देखील पाहू.
आइस्क्रिम आणि फ्रोजन डेझर्टमधील नेमका फरक काय
(icecream) आइस्क्रिम दूध किंवा दुधाच्या क्रिमपासून तयार केले जाते. पण फ्रोजन डेझर्ट (dessert) तयार करतांना व्हेजीटेबल फॅटचा वापर केला जातो. मार्केटमध्ये मिल्क फॅटची किंमत 400 रुपये प्रति किलो असल्यास व्हेजिटेबल फॅटची किंमत 100 रुपयांच्या जवळपास असते. अशातच आइस्क्रिमच्या तुलनेत (dessert) फ्रोजन डेझर्टच्या किंमती कमी अतात. याशिवाय फ्रोजन डेझर्टमध्ये लिक्विड ग्लुकोजचा वापर केला जातो.तर दुसऱ्या बाजूला (ice cream) आइस्क्रिममध्ये कॅलरीज अधिक असतात. कारण आइस्क्रिम (ice cream) तयार करण्यासाठी मिल्क फॅटचा अधिक वापर केला जातो. पण (dessert) फ्रोजन डेझर्टमध्ये कमी कॅलरीज असतात. मात्र यासाठी डेअरी प्रोडक्ट्सचा वापर केला जात नाही.
फ्रोजन डेझर्ट्समध्ये वाढलेली कॅलोरी आणि साखरेची मात्रा
(dessert) फ्रोजन डेझर्ट्समध्ये उच्च कॅलोरी आणि साखरेची मात्रा असू शकते, जे वजन वाढवू शकते आणि डायबिटीज, हृदयविकार यांसारख्या समस्या निर्माण करू शकतात.(icecream) आइस्क्रिम आणि (dessert) फ्रोजन डेझर्टमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. पण (dessert) फ्रोजन डेझर्टमध्ये आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.
दातांवरील परिणाम : साखरेने भरपूर असलेल्या (dessert) डेझर्ट्स दातांमध्ये खराबी आणू शकतात. दातांच्या पृष्ठभागावर प्लाक आणि कॅविटी होण्याचा धोका वाढवतो.
पचनास त्रास
गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचन क्रिया प्रभावित होऊ शकते, त्यामुळे अपचन, गॅस, आणि अन्य पचनविकार होऊ शकतात. (dessert) फ्रोजन डेझर्टमध्ये व्हेजिटेबल तेल आणि आर्टिफिशियल फ्लेवर्स असल्याने पोटात जळळ आणि पचनासंबंधित समस्या उद्भवू शकते.
हायपरटेंशन आणि हृदयरोग
काही फ्रोजन (dessert) डेझर्ट्समध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रांस फॅट्स असू शकतात, जे रक्तदाब वाढवून हृदयरोगास कारणीभूत होऊ शकतात.अतिरिक्त आणि अनियंत्रित सेवनामुळे या समस्या होऊ शकतात
असे ओखळा फ्रोजन डेझर्ट
(icecream) आइस्क्रिम खरेदी करण्यापूर्वी त्याच्या पाकिटावर दिलेली माहिती आणि त्यामधील सामग्री वाचून पहा. येथे तुम्हाला आइस्क्रिम तयार करण्यासाठी डेअरी प्रोडक्ट्स की व्हेजिटेबल ऑइलचा वापर केलाय हे कळले जाईल.