जळगाव,(Najarkaid news) -पती-पत्नीच्या नात्यात संशय निर्माण होणे हे एक खूप गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. यामुळे विश्वासाची कमतरता निर्माण तर होतचं संशयामुळे नात्यातील विश्वास कमी होतो. एकमेकांवर असलेला विश्वास ढासळतो आणि संवादही कमी होतो त्यामुळे दोघांमध्ये मानसिक ताण निर्माण होतो.पती-पत्नी यांच्यात जेव्हा संशय निर्माण होतो, तेव्हा संवाद होणे कठीण होतं होतो त्यामुळे पती पत्नी टोकाची भूमिका घ्यायला मागे पुढे पाहत नाही होतेचं नव्हतं होतं अशी घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
पत्नी गाढ झोपेतच असतांना केला भयंकर शेवट
पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशय होता पतीने संशयाचे भूत डोक्यात इतकं घातलं की संशयावरून पतीनं पत्नी झोपेत असतानाच कुऱ्हाडीने वार करत तिचा निर्घुण खून केल्याची खळबजनक घटना धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे गावात घडली आहे.या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला.
पतीला ठोकल्या बेड्या…
पत्नीचा भयंकर शेवट करत खून केल्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव सोमनाथ सोनवणे आहे.या व्यक्तीनं चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नी शितल सोनवणे हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा निर्घृण खून केला. या घटनेत दहा वर्षांचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावला.मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
पतीकडून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार
सोमनाथ सोनवणे हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीवर संशय घेत होता. नातेवाईकांनी समजावल्यानंतरही त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जात नव्हते. रात्री त्याने मोठ्या प्रमाणात दारू सेवन केली आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास शितल झोपेत असताना तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात शितल गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मृत्यूसोबत तिची झुंज अपयशी ठरली. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी
आरोपीला अटक करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अविश्वास, संशय आणि दारूच्या आहारी जाऊन एका कुटुंबाचा सुखी संसार उद्ध्वस्त झालाय. आता या प्रकरणात आरोपीवर कायदेशीर कारवाई होईल, त्याला शिक्षा देखील होईल. परंतु या संपूर्ण प्रकरणात सोमनाथ आणि शितलच्या दोन निष्पाप मुले आता मात्र, आई आणि वडिलांच्या प्रेमाला मुकणार आहेत. संशयाच्या भुताने एका सुखी संसाराची राख रांगोळी केल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.