जळगाव : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 25 जानेवारी, 2025 रोजी संपूर्ण जिल्हाभरात मतदान केंद्र, विधानसभा मतदार संघ व जिल्हास्तरावर 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसाचा विषय ‘नथिंग लाइक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’ असा आहे.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून या दिवशी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते. तथापि. दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी शनिवार सुटटीचा दिवस असल्यामुळे दिनांक 24 जानेवारी, 2025 रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात यावी.
त्याअनुषंगाने, आपल्या अधिपत्त्याखालील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम दि.24 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजीत करण्यात यावा व या बाबतचा अहवाल फोटोसह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव निवडणूक शाखेत येथे पाठवावा अशा सुचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.