जळगाव- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार १० नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.१ व पेपर क्र.२ घेण्यात आले होते. आता या परिक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी पेपर क्र.१ व पेपर क्र.२ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास परिषदेकडे १६ डिसेंबरच्या अखेरपर्यंत निवेदन पाठवता येणार आहे.
सदर आक्षेप/त्रुटी बाबतचे निवेदन http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येणार आहे.
आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने/ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तसेच विहित मुदतीत ऑनलाईन रित्त्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तसेच विहित मुदतीत ऑनलाईन रित्त्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.