जळगाव– सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या मार्फत “वन जीपी वन बीसी” या सहा दिवसांच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रम ४ डिसेंबरपासून ९ डिसेंबरपर्यंत घेण्यात आला. ग्रामीण भागातील युवक-युवतींना बँकिंग प्रतिनिधी म्हणुन कार्य करण्यासाठी सक्षम करण्याते उद्दिष्ट या प्रशिक्षणाद्वारे ठेवण्यात आले होते. प्रशिक्षणानंतर 10 डिसेंबर रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅड फायनान्स (IIBF) मार्फत अंतिम परीक्षा घेण्यात आली.
परीक्षे दरम्यान अग्रणी बँक व्यवस्थापक श्री प्रणव झा, RSETI संचालक श्री सुमित कुमार झा तसेच प्रशिक्षक संजीवनी मोरे आणि दिग्विजय खंबायत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यालयीन सहाय्यक सचिन मराठे, अश्विनी मराठे, आणि कल्पेश धिवरे यांनीही कार्यक्रमासाठी सहकार्य केले.