हुश्य….. झाली एकदाची निवडणूक, निकाल .. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आमदारकीच्या शपथा… पण हि संपूर्ण प्रक्रिया जवळून अनुभवताना खूप काही शिकायला, अनुभवायला मिळालं.., आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून आपलं सकाळी आठ वाजेच्या आत मतदान करून आपल्या घरी परत येणे आणि निकालाच्या दिवशी निकालाची वाट बघण आपलं मत सत्कारणी लागलं की नाही याची शाश्वती मिळेपर्यंत निकालाची आतुरता बाकी नेहमीसारखं आपलं जीवन पुढे चालत राहनार… असो पण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये समाजातील तळागाळातील लोकांची ओळख झाली त्यातील काही अनुभव मी आपल्याशी शेअर करू इच्छिते मुळात म्हणजे माझ्या लेखनामध्ये कुठल्या *राजकीय पक्षाबद्दल किंवा एखाद्या पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा उमेदवाराबद्दल* मुळीच लेखन असणार नाही लिखाण असणार आहे ते माझ्या सर्व सामान्य मतदाराबद्दल कारण तिथे जेवढे अनुभव मिळाले ते अनुभव एका लिखाणामध्ये व्यक्त करणे अशक्य आहे त्यामुळे दोन-तीन सदर या विषयावर मी लिहिणार आहे खरंतर वाचकांना बरीच प्रतीक्षा होती ताई तुम्ही अजून लिहिलं का नाही लेखन जरी सर्वसमावेशक असलं तरी वेळेचं भानही बाळगाव लागतं …. खरंतर हा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा अनुभव घेण्याची मुळीच इच्छा नाही कारण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचताना त्यांचे बोलके चेहरे बरच काही सांगून जातात खरंतर बिचारांचाही काय दोष दिवसभरातून वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवार कार्यकर्ते प्रचारासाठी येत असतात प्रत्येकाला एकच उत्तर देणे प्रत्येकासमोर एकच भाव चेहऱ्यावर घेऊन येणार भाऊ, ताई फक्त तुम्हीच तुमच्या शिवाय दुसरं कोण हे ठरलेलं उत्तर… उमेदवार निवडीच्या दिवशी म्हणजेच मतदानाच्या दिवशी बापूंचे दर्शन झाल्याशिवाय मतदानाला निघायचं नाही हे मात्र ठरलेल…. मग का हो विकासाबद्दल बोलायचं पुढील पाच वर्ष जे मिळेल त्याच्यात समाधानी राहायचं… कारण काही ठिकाण असे आहेत तिथे मूलभूत सुविधाचाही अभाव आहे… पण काय करणार कदाचित त्यांनाही माहिती असेल आपण मत दिलं किंवा नाही दिल तर परिस्थिती थोडंच बदलणार म्हणून एक दिवसापूर्त का होईना सुख पदरात पाडून घेन…..😞 कारण मी माझे अनुभव सांगते प्रचारा दरम्यान मी अनुभवली व्यसनाधीनता, लाचारी आणि आहे त्या परिस्थितीत ऍडजेस्टमेंट .. अक्षरशः बऱ्याच वेळेस डोळ्यात पाणीही आलं पण पुन्हा मनात विचार आला की या परिस्थितीला जबाबदार कोण हा मोठा गहन प्रश्न आहे कारण लोकशाहीमध्ये मतदाराला राजा संबोधले गेले आहे परंतु हा मतदार राजा फक्त मतदान प्रक्रिये पुरताच असतो का ? बाकीचे पाच वर्ष त्याचं अस्तित्व काय असतं ? कारण त्याला कुठलाही प्रश्न विचारण्याचा अधिकार… माझ्या माहितीप्रमाणे तर नसतोच… परंतु या सर्व गोष्टींमुळे फरपट होते ती भावी पिढीची लहान मुलं जे वाडी वस्तीवरून शाळा कॉलेजेस साठी शहरात येतात त्यांची… जे तरुण शिक्षण होऊन घरी बेरोजगार बसले आहेत आणि पर्यायी व्यसनाधीनते कडे वळले आहेत आणि खूप काही इच्छा असूनही हाताला काम नाही म्हणून संसाराची हेळसांड होताना मूकपणे बघणाऱ्या माझ्या भगिनींची अजून बरच काही…… त्यामुळे बुद्धी वादी व्यक्ती या क्षेत्राकडे खूप कमी प्रमाणात वळतात कारण जवळून अनुभवताना अनेक प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना मानसिक हेळसांड होते हेच मात्र सत्य. लिखाणा पैकी कोणाला काही आवडले नसेल तर नक्की माझ्याशी चर्चा करावी…….
सौ.ललिता ताई पाटील
संचालिका स्पंदन कौन्सिल सेंटर
पाचोरा मो.9922092896