Mukhyamantri Mazi ladki bahin scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार, योजना पुढे सुरु राहील की नाही, यापूर्वी लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींची कागदपत्रे फेरतपासणी करून निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात येण्याच्या चर्चा सुरु असतांना शपथविधी नंतर नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. (mukhyamantri mazi ladki bahin scheme apply online)
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा होता.याबाबत महायुतीला मिळालेल्या भरगोस यशानंतर महायुतीने जाहिर आभारही मानले होते. Eknath shinde सरकारमध्ये या योजनेच्या अंतर्गत 18 ते 60 वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना 1500 रुपये देण्यात आले. ही रक्कम 2100 करण्याचं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणुकी दरम्यान आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं.(mukhyamantri majhi ladki bahin scheme online form)
दरम्यान त्या आधीच नवं ‘लाडकी बहीण’ mukhyamantri mazi ladki bahin scheme योजनेतील लाभार्थ्यांची छाननी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत पहिल्याच पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे.(mukhyamantri mazi ladki bahin scheme online apply)
2100 रुपये देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाडकी बहीण योजना (mukhyamantri mazi ladki bahin scheme) आम्ही सुरुच ठेवणार आहोत. महिलांना महिना 2100 रुपये देणार आहोत. आम्ही या योजनेच्या बजेटचा आढावा घेऊ. त्याचबरोबर जी आश्वासनं दिली ती पूर्ण करु, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर निकषाच्या बाहेर कुणी असेल तर त्यांना वगळण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी केलं. निकषाच्या बाहेरील कुणी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा फेरविचार करु. पण, या योजनेचा सरसकट फेरविचार करण्याची घोषणा नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.