राज्यातील नूतन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या ५ डिसेंबरला पार पडणार आहे. अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुतीने जाहिर केलं नसलं तरी आज मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहिर होण्याची शक्यता आहे.दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde shivsena) यांच्या शिवसेना पक्षाकडून आझाद मैदानावर मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य आमदारांची यादी समोर आली आहे. (Letest marathi news today)
तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde ) हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता सध्या सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने घडत आहेत. उद्या गुरुवारी ५ डिसेंबरला राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबतच अनेक मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. आता यावेळी शिवसेना (shivsena) शिंदे गटाचे कोणते नेते शपथ घेणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.(najarkaid news)
शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?
1) एकनाथ शिंदे (Eknath shinde)
2) दादा भुसे (Dada bhuse)
3) शंभूराज देसाई (shambhuraj desai)
4) गुलाबराव पाटील (Gulabrao patil )
5) अर्जुन खोतकर (arjun khotkar)
6) उदय सामंत (uday samant)
५ डिसेंबरला आझाद मैदानावर 22 ते 34 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याच बरोबर नव्या चेहऱ्यांनासंधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या 6 नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे.(najarkaid.com)
पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित
दरम्यान राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा अतिशय भव्यदिव्य असा असणार आहे. नव्या सरकारचा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) उपस्थितीत राहणार आहेत. या शपथविधीसाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण करण्यात आलं आहे. तसेच केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.