जामनेर,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानसभेतील ज्येष्ठ आमदार आणि सलग सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले भाजप नेते संकटमोचक हे जामनेर विधानसभेतून निवडून आले आहे. याठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाचे कौल हाती आले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत महायुतीने सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर गाठली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि सलग सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले भाजप नेते गिरीष महाजन हे निवडणुकीत विजयी झाले आहेत.