जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव शहर विधानसभा निवडणूक प्रचारार्थ अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांनी दिनांक 18 रोजी शहरातील वाल्मिक नगर भागात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रांगोळ्या,फुले,पाकळ्यांच्या वर्षावात जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
शहर विधानसभा निवडणूक प्रचारार्थ अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांनी जाहीर सभेला संबोधन करतांना म्हणाले की, गेल्या दहा वर्षात शहराचा विकास झालेला नसून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मला एकदा संधी द्या, निवडून आल्यावर मी दिलेल्या जाहीर नाम्यानुसार कामं पूर्ण करेल अशी ग्वाही देतो.
शहरातील वाल्मिक नगर भागात आयोजित जाहीर सभेला परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. तिकीट देतांना भाजपने समाजावर अन्याय केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.